
दिनांक: ०१/०३/२०२६
बांदा: खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित दिनाक ८ एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ दरम्यान क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे .ही स्पर्धा बांदा पाटेश्वर मैदान येथे खेळवण्यात येणार आहे ह्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १ लाख रुपये व द्वितीय पारितोषिक ५० हजार रुपये व बेस्ट बैट्समैन बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर व इतर उत्तेजनार्थ बक्षीस व खासदार चषक प्रदान करण्यात येणार आहे .ही स्पर्धा एक गाव एक संघ व दोन आयकॉन खेळाडू असतील अशी माहिती *माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंच्यायत सदस्य जावेद खतीब व बाळू सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली**यावेळी उपस्थित. गुरुनाथ सावंत, नायनेश्वर सावंत, दीपक सावंत, श्याम मांजरेकर, सुनील धामापूरकर, साईनाथ धारगळकर, राजा सावंत निलेश नाटेकर, संदीप बांदेकर, आपा धामापूरकर, तुषार धामापूरकर, मंदार धामापूरकर, प्रवीण नाटेकर, बंटी गवडाळकर बाबा गाड, ऋषी हरमलकर, गौरव नाटेकर, अर्णव स्वार, साई सावंत मोर्ये ,सिद्ध मोर्ये, विकी कदम, स्वप्निल सावंत बिठू परब,प्रथमेश मोर्ये , सोहेल जमादार, सोहेल खान, रितेश धामापूरकर, शिवनाथ मळेवाडकर , रूपेश बांदेकर, गुरु बिले, प्रसाद नाईक,विलास पावसकर आदी सर्व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. ह्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
