
दिनांक: २८/०२/२०२६
बांदा: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मडूरे १ मध्ये काल दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषादीन साजरा करण्यात आला.
२७ फेब्रुवारी हा दिवस कुसुमाग्रज यांना सांस्कृतिक आदरांजली आहे. त्यांनीच मराठी भाषेला आकार दिला. २७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुण्यात जन्मलेले विष्णू वामन शिरवाडकर हे कादंबरीकार, कवी, नाटककार आणि उत्तम समीक्षक होते. या दिनाचे औचित्य साधून मडूरे शाळा नंबर १ मध्ये मालवणी रील स्टार व एक उत्तम डिझाईनर आर्टिस्ट तसेच अनाथ व गरजूंच्या हाकेला धावणाऱ्या मडूरे गावच्या कन्या सौ अर्चना परब यांनी शाळेला भेट दिली. त्यावेळी त्यांच्या सोबत (बालश्री पुरस्कार प्राप्त) सुमित पाटील व त्यांचे सहकारी श्री सागर कड, श्री विवेक यादव हे सर्व आर्टिस्ट उपस्थित होते. सर्वांनी मुलांमध्ये मिसळून त्यांच्याशी संवाद साधला. मराठी कविता, गाणी गप्पा मारले.गप्पा गोष्टी करता करता मुलांमध्ये रमले मुलांनाही आनंद प्राप्त झाला. मुलांनी गाणी म्हणून दाखवील.त्यानंतर मुलांना खाऊदेण्यात आला.पुढे त्यांनी आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुलांची व पालकांची मराठी शाळेबद्दल उदासीनता याबद्दल आपले मत व्यक्त केले. तसेच पालकांनी मुलांना मराठी शाळेत च शिक्षण द्यावे असे सर्वजण आग्रहाने म्हणाले. त्यानंतर त्यांनी शिक्षकांनी संवाद साधला.
व्यवस्थापन समितीने मोलाचे सहकार्य केले व शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक प्रीती आरोसकर यांनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले उपशिक्षक लक्ष्मण बरागडे यांनी आभार मानले.
