
दिनांक: २९ सप्टेंबर २०२५
बांदा प्रतिनिधी: ओंकार हत्ती पुन्हा कास गावात दाखल झाला असून पहाटे सहाच्या सुमारास हा तेरेखोल नदी उतरून पलीकडे गोवा राज्यात पलायन केल्याची माहिती वनरक्षक रानगिरे यांनी दिली होती.परंतु हा हत्ती आज सायंकाळी ६:३० च्या सुमारास पुन्हा निदर्शनास आला.चाळ आणि वादळ या परिसरात हा सध्या फिरत असल्याची माहिती सरपंच प्रवीण पंडित यांनी दिली. आज सकाळीच तो त्या दिशेने नदीपात्रात उतरून पलीकडे गेला होता. परंतु गोव्यातील तामोशे या भागातून पलीकडच्या वनविभाग प्रशासनाने स्थानिक रहिवाशांनी आपली कारवाई चालू करत आयटम बॉम्ब लावून पुन्हा त्या हत्तीला कासच्या दिशेने मोर्चा वळवायला भाग पाडले. त्यामुळे पुन्हा ओंकार हा कास गावात ठाम मारून राहिलेला आहे. लगतच्या परिसरात तो फिरत आहे.असे छायाचित्रात दिसून येत.वनविभाग प्रशासन हतबल झाले आहे. गावातील जनता त्रस्त झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा हत्ती लोकांच्या घरापर्यंत जाऊन पोचला. परिसरातील शेती व नारळ आणि अन्य झाडांची नासधूस करत असल्याची माहिती सरपंच यांनी दिली. मानवी जीवनास याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले.प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.