
दिनांक: २६ सप्टेंबर २०२५
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील आरंभ सखी महिलांच्या ग्रुपने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्रोत्सवानिमित्त शनिवार २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत आरपीडी हायस्कूल व कॉलेजच्या नवरंग कला रंगमंचावर फक्त महिला व मुलींसाठी गरबा नाईट या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात बेस्ट डान्सर, बेस्ट एनर्जेटिक परफॉर्मन्स, उत्कृष्ट डान्स करणारे ज्येष्ठ नागरिक, बेस्ट कस्ट्यूम तसेच लहान मुलांसाठी ही आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आरंभ सखी महिला ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.