आताच शेअर करा

दिनांक: १९ सप्टेंबर २०२५

सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने मंगळवारी २३ व २४ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निवडक १० भजन संघांना निमंत्रित करण्यात आले आहे.


  मंगळवारी २३ सप्टेंबर रोजी होणारी भजने


सायंकाळी ६ वाजता श्री रामकृष्ण हरी महिला भजन सेवा संघ तेंडोली ( बुवा जुईली राऊळ), सायंकाळी ७ वाजता श्री लिंगेश्वर पावणाई प्रासादीक भजन मंडळ जानवली ( बुवा  योगेश मेस्त्री), रात्री ८ वाजता श्री देव महापुरुष प्रासादीक भजन मंडळ पिंगुळी ( बुवा प्रसाद आमडोसकर ),  रात्री ९:४० वाजता श्री देव समाधीपुरुष प्रासादीक भजन मंडळ मळगाव ( बुवा गौरांग राऊळ ), रात्री १०:४० वाजता श्री देव गोठण प्रासादीक भजन मंडळ वजराट ( सोमेश वेंगुर्लेकर ),

बुधवारी २४ सप्टेंबर रोजी होणारी भजने
सायंकाळी ६ वाजता श्री दिर्बादेवी प्रासादीक भजन मंडळ  कोलगाव ( बुवा भक्ती सावंत),
सायंकाळी ७ वाजता श्री मोरेश्वर प्रासादीक भजन मंडळ वाघचौडी नेरूर ( बुवा भार्गव गावडे), रात्री ८ वाजता विठ्ठल रखुमाई प्रासादीक भजन मंडळ आंदुर्ले ( बुवा अथर्व होडावडेकर ),  रात्री ९:४० वाजता श्री स्वामी समर्थ प्रासादीक भजन मंडळ कलंबिस्त ( बुवा संतोष धर्णे ), रात्री १०:४० वाजता श्री देव रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ पिंगुळी ( बुवा रूपेश यमकर )
        या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ९००० रुपये, द्वितीय ७००० रूपये, तृतीय ५००० रूपये, उत्तेजनार्थ ३५०० रूपये, स्पर्धेतील उकृष्ट गायक २००० रूपये, तर पखवाज वादक, तबला वादक, हार्मोनियम वादक, कोरस आणि झांज वादक यांच्यासाठी प्रत्येकी १५०० रुपयाचे पारीतोषिक देण्यात येणार आहे.
          या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी बाबु इन्सुलकर मेस्त्री ९८२३२२०८६८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सावंतवाडी बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *