
दिनांक: ११ सप्टेंबर २०२५
बांदा प्रतिनिधी:. अक्षय मयेकर
बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्याल बांदाच्या माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमधून लक्षणीय यश संपादन केले आहे. या बाबत प्रशालेचे व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
’राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२५’ अंतर्गत नुकत्याच इन्सुली येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये खेमराज प्रशालेने सादर केलेल्या विज्ञान नाटिकेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. सदर नाटिका बसवण्यासाठी प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक सूर्यकांत सांगेलकर, अरुण सुतार आणि विज्ञान शिक्षिका नेहा दळवी यांनी मेहनत घेतली होती.
या बरोबर सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा विभागाने आयोजित केलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत १९ वर्षाखालील वयोगटातील तसेच १७ वर्षाखालील वयोगटातील दोन्ही संघानी तालुका स्तरावर आपल्या आपल्या गटांमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केले. क्रीडा शिक्षिका सुमेधा सावळ, सुनील परब तसेच ज्येष्ठ क्रीडा शिक्षक तथा प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन. जी. नाईक सर यांचे मार्गदर्शन या खेळाडूंना लाभले. या सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच प्रशालेचे अभिनंदन श्री सदाभाई महाजन यांनी स्वतः उपस्थित राहून तसेच मुलांना बक्षीस देऊन केले. त्याच प्रमाणे बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, शालेय समिती सदस्य, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गातून विद्यार्थ्यांचे त्यांच्या यशाबाबत कौतुक केले जात आहे.