
दिनांक: २४ ऑगस्ट २०२५
सिंधुदुर्ग संपादकीय : काल दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी बिट्स फाऊंडेशन ट्रस्ट आणि कोकण व्हिजन न्यूज यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रकाशित केलेल्या गणेश उत्सव २०२५ च्या आरती संग्रहाचा प्रकाशन सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचे संस्थापक, अध्यक्ष सीताराम गावडे, कोकण व्हिजन न्यूज चॅनेल चे संपादक यश माधव व दिनेश गावडे यांच्या उपस्थित होते.
बिट्स फाऊंडेशन ट्रस्ट सिंधुदुर्गात विविध उपक्रम राबवत असून, कोकणातील गणेश उत्सवाला दरवर्षी आरती संग्रह प्रकाशित करत आहे. संस्था आरोग्य, कला, क्रीडा यांना प्रोत्साहन देत दरवर्षी विविध उपक्रम राबवत आहे. समाजातील अनेक गोष्टींना वाव देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे.
बिट्स फाऊंडेशन ट्रस्टचे कोकण व्हिजन न्यूज या चॅनेलला मोठे योगदान आहे. सद्यस्थितीत हे चॅनेल सिंधुदुर्ग आणि गोवा राज्यात अग्रस्थानी काम करत आहे. हे चॅनेल समाजातील घडामोडींवर लक्ष ठेवून सत्याचा शोध घेत, सत्याच्या बाजूने ठामपणे उभं आहे. सामाजिक, राजकीय, कला आणि क्रीडा या क्षेत्रात बातम्या आणि चित्रफितीच्या माध्यमातून समाजावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहे. या दोन्ही संस्थांचे कार्य जरी वेगळं असलं तरी, गेले काही वर्षांपासून ते समाजासाठी एकत्रित अविरतपणे कार्यरत आहेत.