
दिनांक: १४ ऑगस्ट २०२५
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर
बुधवार दिनांक 13 जुलै रोजी बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथे हिज हायनेस श्रीमंत शिवराम राजे भोसले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्वातंत्र्य पूर्व भारतातील सावंतवाडी या संस्थानचे शेवटचे शासक तथा भारत देश स्वतंत्र झाल्यावर लोक निर्वाचित प्रतिनिधि म्हणून त्यांचे राजकीय कार्य मोलाचे आहे. शिवरामराजेनी सुरु केलेल्या श्री पंचम खेमराज सारख्या महाविद्यालयाचा लाभ आज शेकडो विद्यार्थी घेत आहेत. शिवाय त्यांनी लाख काम, गंजिफा इत्यादी लोककला, साहित्य, स्थानिक व्यवसाय यांनाही पाठबळ दिले. वाचनाची आवड असणाऱ्या राजेंची हजारो पुस्तकांची स्वतःची अशी लायब्ररी होती. महाराजांच्या जीवन चरित्राचा आढावा वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी सिद्धी सावंत तसेच उपप्राचार्य श्री प्रदीप देसाई यांनी घेतला. तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा अनिकेत सावंत यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेच्या संस्कृतिक विभागाद्वारे करण्यात आले होते. या प्रसंगी प्रा अरुण सुतार, प्रा. सुहास सावंत, प्रा. नानासाहेब साळुंके, प्रा. आपा राऊळ, प्रा. अमृता पिळणकर, प्रा. सुमेधा सावळ इत्यादी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कला शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.