आताच शेअर करा

दिनांक: १३ ऑगस्ट २०२५

सावंतवाडी  : शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस १९ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. वाढदिवसाचा मुख्य सोहळा हा हॉटेल मँगोच्या सभागृहात १९ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार असून या सोहळ्याला आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून १७, १८ आणि १९ ऑगस्ट असे तीन दिवस नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात दशावतार नाटकांसह एका ऐतिहासिक नाटकाचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच वाढदिवसानिमित्त शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर यांच्या माध्यमातून लाखे वस्ती आणि महिला निवारा केंद्रात साहित्य वाटप केले जाणार आहे. तर मळेवाड-कोंडुरे येथील दिव्यांग शाळा आणि रोणापाल येथील छात्रालय येथे खेळाचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
तसेच, वाढदिवसाचे औचित्य साधून दोडामार्ग, वेंगुर्ले व सावंतवाडी येथेही विभाग प्रमुख प्रेमानंद देसाई, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस व वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शहरप्रमुख बाबू कुडतरकर, उप जिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, उप तालुकाप्रमुख भैया गोवेकर, संजय मांजगांवकर, जीवन लाड, उपतालुका प्रमुख तथा न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर, बांदा विभाग प्रमुख राजेश विर्नोडकर, आरोंदा विभाग प्रमुख शेखर मांजरेकर, संदेश सोनुर्लेकर, राजन रेडकर, गजानन नाटेकर, पप्पू सावंत, लक्ष्मण उर्फ आना गांवकर, पंढरी राऊळ, माजी नगरसेविका भारती मोरे, गुंडु जाधव आणि सुरेश होडावडेकर आदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *