दिनांक: २७ जुलै २०२५

सावंतवाडी: मुसळधार पावसामुळे घर जमीनदोस्त झालेल्या माडखोल ठाकुरवाडीतील नारायण ठाकूर यांच्यासमोर ऐन पावसाळ्यात निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असुन आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या नारायण ठाकूर यांचा निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी समाजातील दात्यांसह स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी.
मुसळधार पावसात नारायण ठाकूर यांचे घर जमीनदोस्त झाले. यावेळी घराच्या एका बाजूला नारायण ठाकूर झोपल्यामुळे ते बचावले अन्यथा अनर्थ घडला असता. पण तो टळला. या घटनेत त्यांच्या च्या घराच्या छपरासह वासे, रीप व भिंती जमीनदोस्त झाल्या. या घटनेचा नारायण ठाकूर यांना धक्काच बसला असून माडखोल ग्रामस्थांनी नारायण ठाकूर यांची तात्पुरती सोय केली. मात्र ती कायमस्वरूपी नाही.
विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सभापती मंगेश तळवणेकर यांनी नारायण ठाकूर यांना १० हजार रुपयाची मदत करून त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवात केली आहे.
नारायण ठाकूर यांची आर्थिक स्थिती गरिबीची असून त्यांच्यावर आभाळत कोसळले. त्यांचे उत्पन्नाचेही कोणतेही साधन नसल्याने भर पावसाळ्यात त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांचा निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी समाजातील दात्यांसह स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी. त्यासाठी त्यांच्या नाव – नारायण शिवराम ठाकूर, बँक – बँक ऑफ इंडिया, शाखा – माडखोल, खाते नं. – १४९११०११०००३९५५, आय एफ एस सी कोड बी के आय डी- ०००१४९१ या अकाउंट नंबर वर मदत करावी.