
दिनांक: २६ जुलै २०२५
मळेवाड: प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी दिनांक १ऑगस्ट २०२५रोजी पारिजात मंगल कार्यालय कोंडुरा तिठा येथे पारिजात फ्रेंड सर्कल आरोस आयोजित कै. विद्याधर शिरसाट स्मृती कथा कथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिली ते चौथी, (पाच मिनिटे) पाचवी ते सातवी (सात मिनिटे) आठवी ते दहावी (सात मिनिटे) आपली कला सादर करण्यासाठी स्पर्धकांना वेळ दिला जाईल.अशा तीन गटात सदर स्पर्धा होणार आहे. विजेत्याना रोख रक्कम व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. स्पर्धा ठीक दहा वाजता चालू होईल. स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी ९४०४७४८९८० या भ्रमण ध्वनीवर संपर्क करावा.