
दिनांक: १६ जुलै २०२५
माध्यमिक विद्यालय डेगवे या प्रशालेच्या सन १९९९ – २००० सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचने त्यांच्या स्नेह मेळाव्यात ठरल्याप्रमाणे 10 लाकडी बेंच आज शाळेकडे सुपूर्द केले. या बॅचचे माजी विद्यार्थी श्री आबा उर्फ सीताराम देसाई, श्री संदीप वेटे, श्री समीर चिरमुले, श्री संजय ठाकूर, डेगवे गावचे पोलीस पाटील श्री गजानन देसाई आणि सौ हेमांगी देसाई हे आज प्रशालेत उपस्थित होते. गुरुवर्य आदरणीय श्री पी. एन. तेली सर यांच्या हस्ते लाकडी डेस्क मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सन १९९९ – २००० च्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचचे प्रशालेतर्फे हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले.