आताच शेअर करा

दिनांक:  १३ जुलै २०२५


बांदा प्रतिनिधी
    शासनाच्या वतीने मोफत शाळकरी मुलींसाठी मोफत पास योजना असुन त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे. मात्र आपण एसटी बसने प्रवास करत असताना विशेष काळजी घेतली पाहिजे. रस्ता ओलांडताना किंवा बस न थांबल्यास बसच्या मागे न धावता आपण मागून येणाऱ्या बसने प्रवास करावा. बस मध्ये अनोळखी माणसे असतात त्यांच्याशी सवांद न साधता प्रवास करावा.आपण शाळेत येण्याकरता आणि घरी जाण्याकरता शक्यतो एकत्र ग्रुपने बस पकडावी  अशा सूचना विद्या विकास मंडळाचे सचिव गुरुनाथ पेडणेकर यांनी पास धारक विद्यार्थिनीना दिल्या.
      विद्या विकास मंडळ इन्सली संचलित, नुतन माध्यमिक विद्यालय इन्सुली प्रशालेतील तीस विद्यार्थिनींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास सवलत योजनेअंतर्गत पास वितरित करण्यात आले. यावेळी सचिव  गुरुनाथ पेडणेकर बोलतं होते. यावेळी संस्था संचालक मयुर चराटकर, मुख्याध्यापक सुविद्या केरकर, सहकारी शिक्षक राजेश आजगावकर, विनोद चव्हाण,  सचिन पालकर, विद्या पालव, चंद्रलेखा परब, मधुरा तांबे आदी उपस्थित होते. यावेळी  कुडवटेंब व डोबाचीशेळ येथून येणाऱ्या मुलींसाठी हे पास देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सुविद्या केरकर यांनी सुद्धा मुलांना सूचना दिल्या. प्रवास करत असताना नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. तसेच महामार्ग असल्याने काळजीपूर्वक रस्ता पार करावा अशा सूचना दिल्या. यावेळी  शिक्षक विनोद चव्हाण यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *