आताच शेअर करा

दिनांक: ३ जुलै २०२५

बांदा प्रतिनिधि:येथे महामार्गांवर भरधाव वेगात ओहोळात कोसळलेल्या कार मधील चारही पर्यटक सुखरूप असून त्यांना रात्रीच बांदा पोलिसांनी शर्थिचे प्रयत्न करत तुडुंब भरून वाहत असलेल्या ओहोळतून बाहेर काढले. बांदा पोलीस कर्मचाऱ्यांच्या समयसूचकतेमुळे त्यांचे कौतुक होत आहे. क्रेटा कार मध्यरात्री एकच्या सुमारास ओहोळात कोसळली. या गाडीत चारजण होते. सुदैवाने गाडीचा सनरुफ उघडल्याने हे चारहीजण बचावले. सनरुफ उघडल्याने एकाने बाहेर येत महामार्गांवरुन जाणाऱ्या गाड्यांना मदत कार्यासाठी विनवणी केली. दरम्यान अन्य तिघेजण गाडीच्या टफावर उभे राहून मदतीसाठी आरडाओरड करत होते. दरम्यान गस्ती वर असलेल्या बांदा पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तुडुंब भरलेल्या ओहळातून त्यांना बाहेर काढले. प्रथम त्यांना लाईफ जॅकेट देत दोरीच्या सह्यायाने बाहेर काढले. यात चारही जण सुखरूप असुन त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. हे वाहन सावंतवाडीहून गोव्याच्या दिशेने जात होते. यावेळी पोलीस कर्मचारी विलास भोगले, राजाराम कापसे, रोहित कांबळे, दाजी परब या पोलीस कर्मचाऱ्यांनी या तिघांचे प्राण वाचवले. या सर्व कर्मचाऱ्यांच्या समयसूचकतेबाबत त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *