
दिनांक: २३ एप्रिल २०२५
दोडामार्ग /शुभम गवस
पहलगाम (जम्मू काश्मीर) येथे, मंगळवार दि.२२ रोजी, धर्मांध दहशतवाद्यांकडून, पर्यटनासाठी गेलेल्या सुमारे २५ हून अधिक भारतीय नागरिक व कर्तव्यावर असणाऱ्या भारतीय सैनिकांची, द्वेषपूर्वक निर्घृण हत्या करण्यात आली.देशात असलेल्या सर्वाधिक हिंदु लोकसंख्या असून, देशातील हिंदूच सुरक्षित नाही असा ही सवाल उठतो, केवळ धार्मिक द्वेषावर अशा या अमानवीय कृत्याबद्दल जागो जागी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या वतीने जागो जागी निषेध करणयात आला.
केवळ हिंदू असल्यामूळे हिदूराष्ट्रातच अशी क्रूर व निष्पाप हत्या करणे हे पूर्ण अमानविय व क्रूरतेचे प्रतिय दर्शविते . केवळ धर्मांच्या विद्वेषापोटी, घडवून आणलेल्या ह्या सैतानी कृत्याचा, आज दोडामार्ग येथील बाजार पेठेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या वतीने घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध केला.
यावेळी अभाविप प्रदेश मंत्री राहुल राजौरिया,
प्रदेश कार्यकारिणी सदस्य – विनीत परब, सिंधुदूर्ग ,दोगमार्ग शहर मंत्री- सिमंतिनी नाईक,सह शहर मंत्री- मयुर तर्पे, महादेव तर्पे, श्रेयस गवस, वैभव गवस, संघटन मंत्री – शिवाजी भावसार आदी विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी उपस्थित होते.