दिनांक: १७ एप्रिल २०२५
तळवणे प्रतिनिधी : शंकर गावडे
बामणवाडी तिरोडा येथील श्री औदुंबर दत्त देवस्थान मंदिरात शुद्धीकरणाचा विधी होणार त्यानिमित्ताने १५ एप्रिल २०२५ रोजी अनेक धार्मिक विधी तसेच अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत.
आज सकाळी ९:०० वाजता गणेश मूर्तीचे वाजत गाजत आगमन त्यानंतर मूर्ती प्रतिष्ठापना तसेच आरती तीर्थप्रसाद रात्री ८:०० वाजता स्थानिक मंडळाची भजने होतील.
बुधवार दिनांक १६ एप्रिल रोजी श्री देवी माऊलीच्या पालखीचे मिरवणुकीने आगमन होईल. रात्री श्री वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ, तेंडोलि यांचा “दत्त माझा कैवारी” हा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे.
गुरुवार दिनांक १७ एप्रिल रोजी दुपारी एक वाजेपर्यंत संग्रह गणेश, विष्णू याग व इतर धार्मिक विधी होणार आहेत. मुंबई मंडळ आयोजित साठ वर्षांवरील ज्येष्ठ नाट्यकर्मींचा सत्कार समारंभ होणार आहे. शुक्रवार दिनांक १८ एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजा होणार असून अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ, म्हापण यांचा संत कृमादासाची वारी हा नाट्यप्रयोग होणार आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवार दिनांक १९ एप्रिल रोजी संध्याकाळी गणेश मूर्तीचे विसर्जन होऊन त्या कार्यक्रमाची समाप्ती होईल.
सर्व भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
