
दिनांक: २३ जुलै २०२५
बांदा प्रतिनिधी अक्षय मयेकर
खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्हि. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा या प्रशालेतील शिक्षक श्री अनिकेत सावंत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त प्रशालेस अग्निशामक यंत्र भेट दिले. श्री अनिकेत सावंत हे या प्रशालेतील उपक्रमशील व सामाजिक बांधिलकी जपणारे शिक्षक आहेत. या प्रशालेचे शिक्षक असून इतिहास या विषयावर त्यांचा गाड अभ्यास आहे. चांगले व्याख्याते ही त्यांची ओळख असून इतिहासिक विषयावर चांगले व्याख्यान व प्रबोधन समाजात व शालेय विद्यार्थ्यांना वेळोवेळी करत असतात. सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत त्यांनी हे अग्निशामक यंत्र भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणखी एका यंत्राची भर घातली आहे.यावेळी प्रशालेचे प्राचार्य श्री नाईक सर व इतर शिक्षक उपस्थित होते. प्रशालेतर्फे श्री सावंत यांचे आभार मानण्यात आले.