आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर

दिनांक: १५ फेब्रुवारी २०२५

नटवाचनालय बांदा येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  बांदा येथील नट वाचनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा प्रसिद्ध साहित्यिक (कै.) प्र. श्री. नेरुरकर स्मृती साहित्य पुरस्कार यावर्षी युवा मालवणी साहित्यिका सौ. पूर्णिमा प्रकाश गावडे-मोरजकर यांना जाहीर करण्यात आलेला.  काल दी.१४/२ २०२५ रोजी नेरुरकर जयंतीचे औचित्य साधून वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
    
   पूर्णिमा गावडे मोरजकर ह्या मालवणी साहित्यिका असून त्यांचे ‘गजाल गाथण’ हा मालवणी कथासंग्रह हा नुकताच प्रकाशित झाला आहे. त्या स्तंभलेखिका असून समाज माध्यमावर त्यांचे अनेक मालवणी ब्लॉग प्रसिद्ध आहेत. त्यांच्या साहित्य निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 
  शुक्रवार दिनांक १४ रोजी संध्याकाळी ४ वाजता वाचनालयात प्रसिद्ध साहित्यिक (कै.) प्र. श्री. नेरुरकर यांची जयंती साजरी करण्यात आली होती. त्यांनी बांदा गावाला ‘पिंपळगाव’ ही उपमा दिली होती. त्यांच्या स्मृतिदिना निमित्त दरवर्षी एका नवोदित साहित्यिकाला पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

    या कार्यक्रमाच्या वेळी सर्व साहित्यप्रेमी व पूर्णिमा गावडे यांचे आई – वडील, बहीण त्याचप्रमाणे त्यांचा मित्रपरिवारही उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *