आताच शेअर करा

सिंधुदूर्ग: संपादकीय

दिनांक: १४ फेब्रुवारी २०२५

गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आणि तेरवण ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत श्री देवी भावई मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
       या शिबिरात हृदयरोग, उच्च रक्तदाब, ऍलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, लिव्हर व किडनी विकार, हाडाचे व सांध्याचे आजार, पक्षाघात, वातविकार, मधुमेह, मुळव्याध, घसा, थायरॉईड, बालरोग, पचन,  स्त्रीरोग व अन्य जुनाट विकार असलेल्या रुग्णांची तपासणी करुन रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषधे देण्यात येणार आहे.
         या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे मेडिकल कॅम्प इन्चार्ज डॉ प्रशांत ससाणे तसेच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे अन्य वैद्यकीय तज्ञ उपस्थित राहणार आहेत.
         तेरवण परिसरातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आणि तेरवण ग्रामस्थ मंडळाच्यावतीने विजय गवस, सचिन गवस, अजय नाईक, तुकाराम गवस, उमेश गवस, सदाशिव गवस, सुहास गवस यानी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *