
सिंधुदूर्ग : संपादकीय
दिनांक: १३ फेब्रुवारी २०२५
११ फेब्रुवारी २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन सिंधुदुर्ग नगरी येथे आयोजित करण्यात आले होते. या जिल्हास्तर स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा माडखोल नंबर एक च्या चार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी कुमारी अस्मिता उत्तम सावंत हिचा ३०० मीटर धावणे वयोगट चौदा वर्ष या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवला तसेच कुमारी वैष्णवी बाळकृष्ण म्हालटकर हिने १४ वर्षे खालील लांब उडी ( लाँग जंप) या क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून त्यांची २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे या स्पर्धा पंढरपूर येथे संपन्न होणार आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा माडखोल नं.१ पदवीधर शिक्षक श्री विलास रामचंद्र फाले व श्री दीपक सदाशिव पंडित यांचे मार्गदर्शन लाभले.
या जिल्हास्तर क्रीडा स्पर्धेसाठी श्री विजय तुकाराम राऊळ विद्यमान सदस्य व माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती माडखोल तसेच विद्यमान अध्यक्ष श्री आनंद सखाराम राऊळ आणि केंद्राचे केंद्रप्रमुख प्रेरणास्थान म्हणून समजले जाणारे श्री वालावलकर सर यांच्याकडून विशेष प्रेरणा मिळाली.
या विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय निवडीसाठी शाळा व्यवस्थापन समिती शाळा माडखोल जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा माडखोल च्या मुख्याध्यापिका श्रीमती रश्मी रवींद्र सावंत, श्रीमती स्वप्नजा संदीप खानोलकर, श्रीमती अंजली अनिल मुळीक, उपशिक्षक, आणि श्रीमती उन्नती उमेश धोंड, शाळा व्यवस्थापन समिती माडखोल शिक्षक पालक संघ, माता पालक संघ सर्व समित्या व सर्व शिक्षक यांच्याकडून कौतुक करण्यात येत आहे .