
तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे
दिनांक: १३ फेब्रुवारी २०२५
तळवणे गावातील राजाधिराज योगीराज श्री महंत परशुराम भारती महाराज यांच्या मठात होणारा भंडारा उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. त्यानिमित्त मठामध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. सालाबाद प्रमाणे यंदाही तसेच कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.
त्यातील एक खास आकर्षण म्हणजे दी.१५ फेब्रुवारी २०२५ रोजी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या जीवनावर आधारित वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा श्री देवी माऊली कला क्रीडा मंडळ, तळवणे आयोजित “अयोध्याधिश श्रीराम ” हा ट्रिकसीन युक्त नाट्यप्रयोग होणार असून प्रभू श्रीरामांची अयोध्या तळवणे येथील श्री परशुराम भारती महाराज यांच्या मठातील रंगमंचावर ट्रिकसीन नाटकाच्या माध्यमातून अवतरणार आहे.
तरी या नाट्यप्रयोगाचा सर्व नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्याने गावातील स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे