आताच शेअर करा

दिनांक: ११ फेब्रुवारी २०२५

न्हावेली वार्ताहर : श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, सोनुर्ली संचालित माऊली माध्यमिक विद्यालय,सोनुर्ली येथील विद्यार्थिनी कुमारी चैतन्या मिलिंद गावकर हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMSS) परीक्षेत यश संपादन केले आहे.तिच्या या यशाबद्दल तिच्या पालक सौ. मंजिरी मिलिंद गावकर यांच्यासह कुमारी चैतन्या गावकर यांचे मुख्याध्यापक अरुण तेरसे आणि संस्था सचिव नारायण बापू मोर्ये यांनी अभिनंदन केले.
      याप्रसंगी सहाय्यक शिक्षक प्रदीप सावंत व नितीन गवंडळकर उपस्थित होते.तसेच,श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष
दिगंबर मोर्ये ,उपाध्यक्ष आनंद नाईक  नारायण मोर्ये,खजिनदार भारती गावकर  सहसचिव नागेश गावकर,संचालक शंकर गावकर,भरत गावकर,लक्ष्मीदास ठाकूर,मुकुंद परब,दीपक नाईक,शरद धाऊसकर,उदय गाड,सदाशिव राऊळ,आनंदी गावकर,गोविंद धडाम,तेजस गावकर,भूषण ओटवणेकर व गोविंद मोर्ये यांनी यशस्वी विद्यार्थिनी तसेच मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.तिच्या यशामुळे माऊली माध्यमिक विद्यालयाचे व संस्थेचे नाव उंचावले असून,तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *