बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर
दिनांक: १० जानेवारी २०२५
पत्रादेवी पनवेल (एन एच ६६ )मार्गावरील खड्डे तातडीने बुजवा..
मनसे सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत यांची मागणी.
झाराप झिरो पॉईंट ते बांदा (पत्रादेवी – पनवेल एन एच ६६) या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहन चालकांना वाहन चालवणे त्रासदायक होत आहे. या खड्ड्यामुळे भविष्यात मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. असे अपघात यापूर्वी झालेले आहेत. आम्ही वेळोवेळी आपल्या कार्यालयाला कल्पना देऊनही या बाबत कोणतेही कार्यवाही करण्यात आली नाही. सध्या पर्यटन हंगाम सुरू असल्याकारणामुळे वाहतुकीची रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
त्यामुळे येत्या पंधरा दिवसात तातडीने महामार्गावरील खड्डे बुजवावेत. अन्यथा मनसे स्टाईलमध्ये आंदोलन करण्यात येईल. असा इशारा मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी आज कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी- सिंधुदुर्ग यांना निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष अनिल केसरकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ , तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत , शहर अध्यक्ष राजू कासकर , बांदा शहर अध्यक्ष चिन्मय नाडकर्णी , मळगाव विभाग अध्यक्ष राकेश परब , तालुका सचिव सतीश आकेरकर ,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष केतन सावंत व विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष साहिल तळकटकर आधी उपस्थित होते.