तळवणे प्रतिनिधी: राहुल गावडे
दिनांक: २३ डिसेंबर २०२४
न्हावेली गावातील धाऊस्करवाडी येथील ग्रामस्थ्यांनी भविष्यातील पाण्याचा होणारा तुटवडा याचा विचार करून पाणी साठवण्यासाठी नदीला भरगच्च असा बंधारा उभा केला. यामुळे वाहून जाणारे पाणी तेथे साठवले जाते. या पाण्याचा उपयोग शेतीसाठी तसेच इतर छोट्या – मोठ्या कामासाठी केला जातो. यातूनच न्हावेली गावातील धाऊस्करवाडी येथील स्थानिकांचा एकोपा व त्यांच्यात असलेली कामाच्या बाबतीत एकजूट दिसून येते. या पाण्याचा त्यांना पुढच्या काही महिन्यासाठी चांगलाच उपयोग होईल. आनंद आरोंदेकर, विशाल गावडे,बाळा मुळीक,राज धाऊसकर,श्रीराम धाऊसकर,सुरज धाऊसकर,नारायण धाऊसकर इ. ग्रामस्थ व ग्रा.सदस्य सागर धाऊसकर व संतोष नाईक, अजित ,अमोल धाऊस्कर, ग्रामपंचायत कर्मचारी व सरपंच, ग्रामसेवक यांचेही सहकार्य लाभले यांच्या सर्वांच्या सहकार्यातून हे बंधारे बांधण्याच काम परिपूर्ण झाल. धाऊसकरवाडी तसेच न्हावेली भोम येथील बंधारा ही पाणी साठवण्यासाठी बांधण्यात आला.