संपादकीय:सिंधुदुर्ग
१६ मे २०२४
मडूरा दशक्रोशीत सराईत चोर रात्रीच्या वेळी चोरी करण्यास फिरत असून डिगवाडी येथील मडूरा बांदा मुख्य रस्त्यावर बांधकाम विभागाचे फुल उभारणीचे काम चालू आहे.त्या फुलाचे काम ठेकेदार दादा भाईप करत आहेत गेले दोन महिने हे काम चालू असून दोन दिवसापूर्वी नदीतून पाणी काढण्यासाठी लावलेला १ चा पंप पाईप कापून चोरट्याने पळून नेला. तसेच पाच पोथी सिमेंट आणि त्यावर घातलेली ताडपत्री चोरट्याने लंपास केली आहे. एवढेच नव्हे तर काही दिवसापूर्वी ह्या चोरट्याने तिथे उभा असलेला जे सी पी ची बॅटरी काढून तीही लंपास केली आहे. तेथील एका फोर व्हीलर गाडीची बॅटरी काढण्याचा प्रयत्न करत असताना त्या गाडीचा सायरन वाजल्याने गाडी मालक उठून बाहेर आला आणि चोर तिथून पळून गेला त्यामुळे त्या गाडीची बॅटरी चोरट्याने चोरून नेता – नेता वाचली.
हा चोर मडूरा दशक्रोशीत वावरत असून दोन दिवसापूर्वी ह्या चोरट्याने दशक्रोशीतील काही टू व्हीलर वाहनावर हात साफ करण्याचा प्रयत्न केला असावा अशी शक्यता दर्शवण्यात येत आहे. माजी उपसरपंच विजय वालावलकर यांनी सर्व गावा सहित दशक्रोशीतील ग्रामस्थांना आवाहन केले की कोणीही आपले घरातील वाहन घरा शेजारी उभे केले असता त्या गाडीला रात्रीच्या वेळेस चावी लावून ठेवू नये. अशा गाड्यांना चावी असल्यास गाडी चोरीला जाण्याची शक्यता आहे.