बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर
दिनांक: २२ डिसेंबर २०२४
यांस सर्वस्वी म. रा. वि.वितरण कंपनी जबाबदार राहील-
निवृत्त शिक्षक – जगन्नाथ पंडित.
सातोसे रेखवाडी,तालुका सावंतवाडी येथील ट्रांसफार्मर आणि सातोसे रेखवाडी शाळा नं-2 येथील विद्युत खांब धोकादायक बनल्या बाबतचे निवेदन माननीय कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, विभागीय कार्यालय कुडाळ, तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांना यांना दिनांक १२/१०/२०२४ च्या निवेदनाद्वारे कळविलेले होते तसेच या संदर्भातील माहिती माननीय कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उपविभागीय कार्यालय सावंतवाडी आणि माननीय सहाय्यक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा कार्यालय बांदा -२ यांना कळविण्यात आले होते. सातोसे रेखवाडी येथील विद्युत खांब व विद्युत वाहिन्या यांची जोडणी ही ३५ ते ४० वर्षांपूर्वी केलेली असून ट्रान्सफॉर्मर हा खूपच जिर्ण झालेला असून तो रस्त्याच्या कडेला उंचावर असून रस्ता खचत असल्याने तो धोकादायक बनला आहे, तसेच रस्त्यावर तो केव्हाही कोसळू शकतो. महाराष्ट्र वि. वितरण कंपनीच्या कर्मचारी वर्गाला सुद्धा काम करण्यासाठी तिथे जाणे कठीण झालेले आहे.तसेच सातोसे रेखवाडी शाळा नं. २ जवळ असलेला खांब हा खूप गंजलेला असून खाली मोठे भगदाड(मोठे शिद्र ) पडलेले आहे. शेजारी अंगणवाडी व बस थांबा आहे, या ठिकाणी लोकांची वर्दळ असते.या सर्व बाबींचा विचार करून ताबडतोब कार्यवाही होणे गरजेचे होते, परंतु निवेदन देऊन दोन महिने झाले तरीही अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. सदर ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जबाबदार राहील असे सातोसे रेखवाडी येथील निवृत्त शिक्षक जगन्नाथ पंडित यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.