सावंतवाडी प्रतिनिधी
दिनांक: १४ डिसेंबर २०२४
ओटवणे येतील “जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओटवणे नंबर एक “या शाळेत ‘आम्ही बालकवी संस्था सिंधुदुर्ग ‘या सामाजिक सं स्थे तर्फे ‘एक तास कवितेसाठी ‘हा उपक्रम आयोजित केला होता.
यात सुरवातीला या शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश गावडे सर यांनी उपस्थितसर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.तनंतर कविवर्य. श्री. कृष्णा ज. गवस, तसेच कवियत्री. कु. सिद्धी बोन्द्रे यांच्या बहारदार कविता वाचनाने या कार्यक्रमाची सुरवात झाली.
यानंतर विदयार्थी नां कवितेविषयी मार्गदर्शन करण्यात आले, कविता हसत -खेळत आणि वातावरण कंटाळवाणे न होता अगदी सहजपणे व विषयाला अनुसरून कविता कशी लिहावी, यात मुलांना एखादा शब्द देऊन त्यावर कविता लिहिण्यास सांगून तसेच आपल्या आवडीच्या सण -उत्स वावर कविता लिहिण्यास प्रोसाहीत करण्यात आले. आई -बाबा या विषयावर तर सर्वच मुलांनी छान छान कविता लिहिल्या.
लिहिलेली कविता वाचतानाच त्या कवितेचा भाव -बंध, आशया चे चित्र डोळ्यासमोर उभे राहावे इतकी कविता बोलकी असावी आणि ती कशी लिहावी याचे धडे देण्यात आले.
जीवनात एखादा छद लहानपासूनच जोपासावा जेणेकरून आपलं जीवन कला मय व्हावे आणि हळूहळू त्यात प्रगती करून आपल्याला मान सन्मान मिळून यातूनच आपल्या शाळेचे नाव व आपल्या गावाचे नाव झळकावे अश्या प्रकराचे मार्गदर्शन या संस्थेचे अध्यक्ष कविवर्य. श्री. राजेंद्र गोसावी, त्यांचे सहकारी कवी. कृष्णा ज. गवस, व कवियित्री. कुमारी. सिद्धी बोन्द्रे यांनी केले. या उपक्रमात आपल्या कला गुणांची चमक दाखविलेल्या —वेगवेगळे शब्द घेऊन कवितेची सुबक –सुंदर माळा गुंफणाऱ्या मुलांना सन्मान पत्र देण्यात आली.
यात अनुक्रमे कु. रुद्र सु. बुराण, जयराम सं. गावकर, रिया ग. कर्पे, स्नेषा श. तावडे, दुर्वा श. पंदारे, वैष्णवी स. कविटकर, श्रवणी म. खरवत, आस्था लु. जाधव, वैभवी वी. भानसे, पूर्वा सु. गावकर, शमिका म. नाईक, अथर्व ज्ञा. मयेकर, अनन्या अ. वारंग, रिया स. गावकर, स्वरा शं. तावडे, नंदिनी रा. काटाळे, दर्शना झी. मेस्त्री, व कपिल वि. मेस्त्री य्यांचा समावेश होता.
तसेच कु. रुद्र सु. बुराण, दर्शना झि. मेस्त्री, पूर्वा सु. गावकर, सोहम गावकर, वैष्णवी स. कविटकर यांना रोख स्वरूपात बक्षीसे देण्यात आली…. तसेच शेवटी सर्व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमा चे आयोजन बांदा– वाफोली येथील कवी श्री. कृष्णा ज. गवस यांनी यशस्वी पणे केले होते.
शेवटी शाळेचे सांस्कृतिक शिक्षक श्री. मेस्त्री सर यांनी आम्ही बालकवी संस्थेच्या सर्व सदस्य यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.