आताच शेअर करा

सिंधुदुर्ग संपादकीय

दिनांक:१३ डिसेंबर २०२४

वैभववाडी -वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पाच्या कालव्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून येत्या एप्रिल-  २५ पासून शेतकऱ्यांच्या शेतात थेट पाणी येईल अशी माहिती जलसंपदा अधिकाऱ्यांनी बोलताना दिली आहे. त्यामुळे वैभववाडीतल्या निम्या गावातील शेतकऱ्यांचे नशीब पालटून जाणार आहे.
      या बाबत अधिक माहिती अशी की, अरुणा प्रकल्प हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा सहकार्याने होत आहे.पंतप्रधान सिंचन योजनेतून निधी मिळाल्याने केंद्रीय सचिव सतत आढावा घेत असतात.या प्रकल्पाचे काम येत्या फेब्रुवारी २०२५पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन झालेले आहे.यावेळी  धरणाला गेट बांधून पाणी अडविले गेले आहे.सध्या ८० टक्के पाण्याचा साठा आहे.१३ किलो मीटर लांबीचे मातीचे कालवे व १० किलो मीटर लांबीचे नलिका प्रणाली द्वारे कालवे असे  एकूण २३ किमी लांबीचे कालवे असून त्याचे काम जवळ जवळ ९० टक्के पूर्ण झाले आहे.सध्या एडगावात कालव्याचे काम अंतिम टप्यातील सुरु आहे.मोठ्या म्हणजे मेन लाईनच्या पाईपचे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे.त्यानंतर शेत जमिनीत जाणाऱ्या दोन पोट पाईप लाईनची कामे हाती घेतली जाणार आहेत.शेतकऱ्यांच्या शेतात पाईप द्वारे पाणी देण्याचे नियोजन झालेले आहे.ती कामे पुढे पूर्ण केली जाणार असून येत्या ३ महिन्यात काम पूर्ण होईल अशी माहिती जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

१५ गावांचे नशीब पालटणार

हेत,मागवली,वेंगसर,उपळे,अजिवली,मठ, कोळपे, भुईबावडा,
तिरवडे,कुसूर,उंबर्डे,सोनाळी,एडगाव वायंबोशी,व राजापूर तालुक्यातील काही गाव इत्यादी १५ गावात पाण्याची गंगा वाहणार आहे.५३१० हेक्टर जमीन सिंचना खाली येणार आहे.या प्रकल्पाच्या कामाला एकूण १८०० कोटी रुपये खर्च होणार आहे. अरुणा मध्यम सिंचन प्रकल्प हा भोम,आखवणे या गावात उभारला आहे .

सांगुळवाडी गावाला पाणी देण्याचा विचार ?

अरुणा प्रकल्पाचे पाणी नलिकाद्वारे पुरविण्यात येणार असल्याने त्याचा साठा हा मुबलक असणार असून अतिरिक्त पाणी असणार आहे.त्यामुळं ते पाणी आजूबाजूच्या गावाला द्या असे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे अरुणा प्रकल्पाच्या जादा पाण्याचे वितरण वायंबोशी आणि सांगुळवाडीतील काही गावांना करण्याबाबत विचार झालेला आहे. नलिकाद्वारे पुरविण्यात येणारे पाणी हे ग्रॅव्हिटी बेसिसने पुरवठा होत आहे.एडगाव पर्यत्तचा भाग हा तळाला आणि सांगूळवाडीचा भाग उंच असल्याने त्या गावाला पाणी पुरवठा करण्याबाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत त्या साठी एका संस्थेने या बाबत एक सर्व्हे केला असून सांगुळवाडी भागात मोठं मोठ्या विहीर बांधून शेतीला पाणी देण्याचा विचार असल्याची माहिती जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

          वृक्ष मुल्याकंनाचे पैसे वाटप

कालव्याच्या बांधकामाच्या  लाईन मध्ये अडथळा ठरणाऱ्या वृक्षांचे मुल्याकंन झालेले असून कुसूर ,सोनाळी गावातील शेतकऱ्यांना भरपाई दिली गेली आहे.एडगावातील शेतकऱ्यांना येत्या महिन्यात पैशाचे वाटप केले जाणार असल्याचे संबंधितांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *