सावंतवाडी / प्रतिनिधी
दिनांक:१० डिसेंबर २०२४
राणी पार्वती देवी हायस्कुल शैक्षणिक वर्ष 1995-96 इयत्ता बारावी बॅच चा स्नेहमेळावा आज सावंत फार्म, माडखोल येथे मोठया उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्याला एकूण २८ माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात प्रामुख्याने मुंबई, गोवा,खारेपाटण,मालवण आणि सावंतवाडी या विविध ठिकाणाहून माजी विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाल्या.
सुरुवातीला सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत झाले तदनंतर घावणे चटणी हा मालवणी नाश्ता सर्वांनी चाखला. सावंत फार्म मधील विविध स्पॉट फिरताना शॉवर बाथ आणि फॉउंटन या ठिकाणी सदिच्छा भेटी झाल्या त्यानंतर विविध माजी विद्यार्थ्यांनी आप आपले कलागूण सादर केले. पूर्वाश्रमिची अपर्णा हिने कराओके गायन केले त्यासाठी मालवणकर, वैशाली,बबिता, महेश, प्रवीण यांनी सुंदर साथ दिली. गोवन भाषेत मालवणी गीत सादर करून लीना हिने वाहवा मिळविली. राजन नाईक यांनी दशावतारातील व्हीलन आणि राजा या दोनही भूमिका साकारल्या त्यासाठी सर्वांनी प्रचंड वाहवा दिली. कानसे यांनी विविध जोक्स सांगून संपूर्ण कार्यक्रमात रंगत आणली.
त्यानंतर सावंत फार्म कडून उत्कृष्ठ शाकाहारी आणि मांसाहारी उत्तम जेवणाची मेजवानी सर्वांनी अनुभवली.. उत्कृष्ट चवीचे मालवणी जेवण जेवल्यानंतर काहीजण क्षणभर विश्रांतीसाठी विविध ठिकाणी पहुडले.
दुसऱ्या सत्रात संगीत खुर्ची हा कार्यक्रम झाला त्यात महेश सावंत विजेता ठरला तर उपविजेती म्हणून मंजुषा हिने मान पटकावीला. त्यानंतर डॅम परिसर फिरून शेवटी कांदाभजी आणि चहाचा आस्वाद घेऊन या स्नेहमेळाव्याची सांगता झाली.