बांदा प्रतिनिधी :अक्षय मयेकर
दिनांक: २ डिसेंबर २०२४
सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा देव दीपावली निमित्त श्री देव बांदेश्वर भूमिका मंदिरात दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. यात शेकडो भाविकांनी सहभाग घेत दोन्ही मंदिरात पणत्या लावून परिसर उजळवून उत्साहात दीपोत्सव साजरा केला. पणत्या व तेल देवस्थान कमिटी कडून उपलब्ध करून देण्यात आले होते. यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष राजाराम ऊर्फ बाळू सावंत व कमिटीचे इतर सदस्य उपस्थित होते.