बांदा प्रतिनिधी : संकेत वेंगुर्लेकर
ता:१ मे २०२४
मडुरा ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वर्धापन दिन सोहळा रविवार ५ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी श्रींची पूजाअर्चा, त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. सायंकाळी महिलांची फुगडी, त्यानंतर स्थानिकांचे भजन, रात्री १० वाजता मडूरा परबवाडीच्या आदर्श तरुण हौशी नाट्यमंडळाचे ‘संगीत रुक्मिणी स्वयंवर’ हे नाटक होईल. यात प्रवीण परब, भूषण परब, दिनेश परब, अरविंद परब, केशव परब, प्रशांत परब, सुभाष परब, बुधाजी परब, अभय परब, अविनाश परब, शारदा शेटकर, लक्ष्मी महात्मे, प्राची परब यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीदेवी माऊली देवस्थान उपसमिती मार्फत करण्यात आले आहे.