
संपादकीय:सिंधुदुर्ग
ता: २६ एप्रिल २०२४
मोरगांव येथे टाकवडी श्री देव वंश देवस्थानचा कलशारोह कार्यक्रमास सुरावात झाली असुन शुक्रवारी सकाळी कलश मिरवणूक कऱण्यात आली. शनिवारी सकाळी ८: ०० वाजता ते दुपारी १:०० वाजे पर्यंत धार्मिक कार्यक्रम मंगलाचरण, यजमानांसाठी देवशुद्धीकरण, देवतांना निमंत्रण, प्रधान संकल्प गणपती पूजन, पुण्यह वाचन मातृकापूजन, नांदी श्राद्ध, आचार्य पूजा, प्रकारशुध्दी, जलाधिवास, लघुरुद्र पूजा, मंगलदेवता पूजन, अग्नी, ग्रह पूजा, वास्तु ग्रहयजन, पर्याय होम, शिखर कलश देवतांसाठी हवन, लघुपूर्णाहुती, शिखरकलश शय्याधीवास, नैवेद्य, महाआरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, रविवार दिनांक २८ रोजी सकाळी ९: ००वाजता मंगलाचरण, प्रकारशुद्धी, आवाहित देवता पूजन, श्री वंश देवता महापूजा तत्त्व होम. सकाळी १०: वाजून १० मि. शिखर कलश प्रतिष्ठापना बलिदान पूर्णाहुती, श्री देव सत्यनारायण महापूजा अभिषेक,महाआरती, महाप्रसाद आणि रात्रौ ठीक ९: ३०वा. दोन अंकी हृदयस्पर्शी कौटुंबिक नाटक “विठाईच्या काठी”तरी सर्व भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती देवस्थान कमिटी टाकवाडी यांनी केली आहे

