बांदा प्रतिनिधी/ संकेत वेंगुर्लेकर
दिनांक:२५ सप्टेंबर २०२४
येथील पोलीस स्थानकात एकवीस दिवसीय गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे आज होणाऱ्या सायंकाळी ७ वाजता जंगी डबलबारी भजन सामना बघण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी बांदा पोलिस स्टेशन येथे पाहण्यास मिळत आहे.दोन्हीं बुवा तोलामोलाचे असल्याने भजन प्रेमींनी अलोट गर्दी केली आहे प्रेक्षकांच्या मनात आनंदाचे वातावरण दिसत आहे. हा सामना बांदा पोलिस स्टेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे.
श्री लिंगेश्वर प्रसादिक भजन मंडळ भरणी कुडाळ येथील बुवा विनोद चव्हाण (गुरुवर्य चिंतामणी पांचाळ यांचे शिष्य) आणि श्री पडेलकर प्रसादिक भजन मंडळ धालवली देवगड येथील बुवा अखिलेश फाळके (गुरुवर्य ज्ञानदेव मेस्त्री, बुवा प्रकाश पारकर यांचे शिष्य) यांच्यात हा डबलबारी भजनाचा सामना रंगणार आहे. बुवा विनोद चव्हाण यांना पखवाज साथ तुषार लोट तर तबला साथ भावेश राणे करतील. बुवा अखिलेश फाळके यांना पखवाज साथ रोहित मोंडे तर तबला साथ दीपक समजिस्कर करणार आहेत. या डबल बारी भजन सामन्याचा लाभ भजन प्रेमिनी घ्यावा असे आवाहन बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे व पोलीस कर्मचारी वृंदाने केले आहे.