सातार्डा प्रतिनिधि: संदिप कवठणकर
दिनांक:२४ सप्टेंबर २०२४
सातार्डा येथे तलाठी कार्यालयासमोर पावसाचे पाणी साठून व रस्त्यावर वाहत आहे.रस्त्यावरून जाणाऱ्या जनतेस नाहक त्रास भोगावा लागत आहे.
सविस्तर माहिती अशी आहे की आज झालेल्या अचानक जोरदार पावसामुळे सातार्डा तलाठी कार्यालय समोर गटारातील पाणी बाहेर पडून रस्त्यावरून वाहत आहे. पूर्ण पावसाळा अशीच परिस्थिती होती. गेले काही दिवस पावसाने दडप मारली होती. पण अचानक आलेल्या पावसाच्या सरीमुळे पावसाचे पाणी गटारे भरून रस्त्यावर फिरत आहे. रस्त्यावर गाड्या चालत असताना ये – जा करणाऱ्या लोकांवर गहाण पाण्याचा वर्षाव होत आहे. संबंधीत बांधकाम विभागाचा लक्ष नसून पुर्ण पावसाळा ह्या नाहक त्रासाला जनतेला बळी पडावे लागले. बांधकाम खाते करते काय? असा सवाल स्थनिक रहिवाश्यांच्या मनात उद्भवत आहे. तरी संबंधित बांधकामान विभागाने लक्ष टाकून लवकर नाले व गटारे साफसफाई करवी.