आताच शेअर करा

सिंधुदूर्ग:संपादकीय

दिनांक:११ सप्टेंबर २०२४

महसूल खात्याचे चाललंय काय ?

सावंतवाडी तालुक्यातील चिरेखाणी आणि क्रशर यांचा महसूल खात आणि प्रशासनावर अंकुश आहे का ?
हा आता प्रश्न आता प्रत्येक नागरिकांच्या मनात सुरु आहे. नुकत्याच  माळेवाड येथील चिरेखाणी मध्ये लहान मुलीचा झालेला अपघात हे याच धडाधडीत उदाहरणं आहे. त्या मुलीचा अपघातात मृत्यू होऊन 15 दिवसा नंतर तिचा मृत देह प्रशासनाने बाहेर काढला. हा अपघात होता की घातपात असा प्रश्न पडतो.
कारण एका मुलीचा अपघातामध्ये मृत्यू होतो आणि त्या मृतदेहाची कोणाला कानोकान खबर नं लागता त्याची विल्हेवाट लावली जाते आणि प्रशासनाने तो मृत देह बाहेर काढल्या नंतर प्रशासनाने संबंधित आरोपीना अटक केली. परंतु झाले काय एवढा मोठा गुन्हा करून दुसऱ्या दिवशी ते आरोपी जमिनावर बाहेर पडतात. म्हणजे किती मोठी सेटिंग आहे या मागे नक्की कोणाचा हात आहे हा मोठा प्रश्न आहे. हे सगळं बघितल्या नंतर असा संशय येतो की अजून किती मृत देह या चिरेखाणींमध्ये दफन असतील.

*एवढा मोठा अपघात त्यात एका मुलीचा मृत्यू होतो आणि मृत देहाची परस्पर विल्हेवाट लावली जाते. या चिरेखाण व क्रशर मालकांवर कोणाचा वरदहस्त आहे पालक मंत्री का शिक्षण मंत्री??*
सदर चिरेखाणी आणि क्रशर बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वारंवार तक्रार करून ही प्रशासन डिम्म दिसत आहे. महसूल खात आणि प्रशासनाने लवकरात लवकर सावंतवाडी तालुक्यातील अनधिकृत चिरेखाणी व क्रशर वर कारवाई करावी तसेच ज्या चिरेखाणी अधिकृत आहेत पण एका पास वर तीन ते चार फेरे मारून शासनाचा महसूल बुडवत आहेत त्यांच्या वरही कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महसूल खाते आणि प्रशासना
विरोधात प्रखर आंदोलन उभारेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *