गोवा: हरमल प्रतिनिधि
दिनांक:२ सप्टेंबर २०२४
गोवा मराठी अकादमी आणि न्यू इंग्लिश हायस्कुल, केरी यांच्या संयुक्त विद्यमाने बक्षीबहाद्दर जिवबादादा केरकर ग्रंथ अर्पण सोहळा व त्यांच्या जीवन कार्याचा परिचय असा कार्यक्रम उदया दि. ३ सप्टेंबर रोजी केरी पेडणे येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
न्यू इंग्लिश हायस्कुलच्या सभागृहात होणाऱ्या या सोहळ्यास गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, दै नवप्रभाचे संपादक श्री परेश प्रभू मार्गदर्शन करणार आहेत. तसेच धरती नागोजी, सरपंच, श्री व्रजेश केरकर, चेअरमन, न्यू इंग्लिश हायस्कुल, श्री शैलेंद्र कुबल, व्यवस्थापक, न्यू इंग्लिश हायस्कुल हे मान्यवर उपस्थित असतील.
यावेळी केरीचे थोर सुपुत्र बक्षीबहाद्दर केरकर यांच्या चरित्रावर आधारित मराठी एकादमीने अलीकडेच पूनरप्रकाशीत केलेल्या प्रथम खंडाचा अर्पण सोहळा होईल. त्यात जिवबादादा केरकर वंशज, केरी ग्रामपंचायत, न्यू इंग्लिश हायस्कुल, जेष्ठ साहित्यिक मो. ग. रांगणेकर वंशज – श्री मधुकर रांगणेकर, परिसरातील विद्यालये , देवस्थान यांना कार्यक्रमात ग्रंथ भेट दिले जातील.
कार्यक्रमाचे निवेदन संत सोहिरोबानाथ आंबीये महाविद्यालय, विरनोडाचे
प्रा आनंद कोळंबकर करणार आहेत.