आताच शेअर करा

न्हावेली : प्रतिनिधि

दिनांक: १९ ऑगस्ट २०२४
     तळवडे येथील आयोजित करण्यात आलेल्या नॅानस्टॅाप चक्रीय भजन स्पर्धेत पिंगुळी येथील महापुरुष भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.तर सिद्धीविनायक भजन मंडळ,कणकवली यांनी द्वितीय तर मूळपुरुष भजन मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला.तळवडे येथील कै.प्रकाश परब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिंक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
     या स्पर्धेत एकूण सात मंडळानी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम इसोटी भजन मंडळ,मातोंड,उत्तेजनार्थ द्वितीय भगवती भजन मंडळ,बाव तर उत्तेजनार्थ तृतीय कोटेश्वर भजन मंडळ,कणकवली यांनी मिळविला.तर वैयक्तिक बक्षिसे पुढीलप्रमाणे – उकृष्ट गायक महापुरुष भजन मंडळ,पिंगुळी ( बुवा – प्रसाद आमडोसकर ) उकृष्ट हार्मोनियम कोटेश्वर भजन मंडळ,कणकवली ( सुजित परब ) उकृष्ट पखवाज सिद्धिविनायक भजन मंडळ,कणकवली ( तुषार लोट ) उकृष्ट तबला महापुरुष भजन मंडळ,पिंगुळी ( साई नाईक ) उकृष्ट कोरस इसोटी भजन मंडळ,मातोंड ,उकृष्ट झांज भगवती भजन मंडळ,बाव ( सुरज करलकर ) यांना देण्यात आली.या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ११ हजार, द्वितीय ७ हजार, तृतीय ५ हजार तर चतुर्थ पारितोषिक ३ हजार ५०० व सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र ठेवण्यात आली या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून भालचंद्र केळूसकर व गजानन देसाई यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *