कोकण व्हिजन न्यूज
(शोध सत्याचा)
संपादक: यश माधव
बांदा प्रतिनीधी:संकेत वेंगुर्लेकर
ता: १३ एप्रिल २०२४
भारतीय जनता पार्टी बांदा मंडल महिला मोर्चा कार्यकारणी दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजी श्री स्वामी समर्थ हॉल बांदा येथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन कार्यकारणी सादर करण्यात आली. त्यामध्ये सौ. सानिका कृष्णा गावडे गाव मडूरा यांची बांदा मंडल महिला मोर्चा कार्यकारणीत तालुका उपाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली यावेळी त्यांना तालुकाध्यक्ष बांदा मंडल सौ. रूपाली शिरसाट यांच्या हस्ते नियुक्तीपत्रक प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना सौ. सानिका गावडे म्हणाल्या की हा पक्षाने दिलेला मला बहुमान आहे याचा मी स्वीकार करत आहे. मी पक्षांमध्ये राहून केलेल्या कामाची पोच पावती आहे. वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी आणि माझ्यावर ठेवलेला विश्वास ह्याला तडा जाऊ देणार नाही. दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडेन पक्ष वाढीसाठी असंख्य मेहनत घेऊन पक्षामध्ये महिलांना सामावून घेण्याचा प्रयत्न करेन. पक्षाची ध्येय धोरणे समजून सांगण्याचे काम करेन असे आश्वासन पक्षाला सौ. सानिका गावडे यांनी दिले आहे.