सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर
दिनांक ३ ऑगस्ट २०२४
डॉ प्रविणकुमार ठाकरे यांना मातृशोक
सावंतवाडी प्रतिनिधी
नागपूर मानेवाडा शाहूनगर येथील सौ कांताताई गणेशराव ठाकरे (७०) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नागपूर जिल्ह्यासह परिसरातील खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी, सीआरपीचे कमांडंट, आयपीएस अधिकारी, डॉक्टर, वकील आदी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत ठाकरे कुटुंबीयांचे सांत्वन केले. शनिवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य गणेशराव ठाकरे यांच्या त्या पत्नी, सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रा. डॉ प्रविणकुमार ठाकरे यांच्या त्या मातोश्री तसेच भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रा. डॉ मुग्धा ठाकरे यांच्या त्या सासू होत. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, सुना, दिर, जाऊ, पुतणे, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे.