कोकण व्हिजन न्यूज
(शोध सत्याचा)
संपादक: यश माधव
बांदा प्रतिनीधी: संकेत वेंगुर्लेकर
ता: १२ एप्रिल २०२४
येथील आस्था क्लिनिकल लॅबच्या वतीने बांदा शहरातील पत्रकारांची वैद्यकीय चिकित्सा करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सचिव मयूर चराटकर यांनी केले.
सद्यस्थितीत उन्हाचा तडाखा वाढल्याने उष्म्याचे आजार देखील बळावले आहेत. पत्रकार हा दिवसरात्र फिरतीचे काम करत असतो. अशावेळी पत्रकाराने स्वतःची काळजी घेण्यासाठी अशा चिकित्साची गरज असल्याचे यावेळी मयूर चराटकर यांनी बोलताना सांगितले. आस्था लॅबचे संचालक अमेय गवस यांनी उपस्थित पत्रकारांचा रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी केली.
यावेळी पत्रकार निलेश मोरजकर, प्रवीण परब, अजित दळवी, विराज परब, यश माधव आदी उपस्थित होते. प्रवीण परब म्हणाले की, पत्रकारांसाठी असे उपक्रम हे गरजेचे असून वाढत्या उषम्यात पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन काम करावे. आभार निलेश मोरजकर यांनी मानले.