आताच शेअर करा

दिनांक:०३/११/२०२६

सातार्डा प्रतिनिधी: संदीप कवठणकर

सातार्डा:आरोंदा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य सुधाकर कवठणकर यांनी आज सातार्डा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट दिली. शेतकऱ्यांना पशु साठी लागणाऱ्या चाऱ्याच्या बियाण्याचे म्हणजेच मक्याचे वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा मिळवून दिला.  हा चारा बियाणे वाटप करत असताना त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे की मी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या सोबत राहीन.शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत साथ देऊन शेतीमध्ये आणि पशुसंवर्धनामध्ये जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून योगदान देण्याचे प्रयत्न करेन. शेतकऱ्यांवर कोणते ही महा संकट आल्यास त्या शेतकऱ्यांनी आपला घरचा माणूस  म्हणून केव्हाही मला हाक मारावी मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या सोबत उभा राहून त्यांना जमेल ते सहकार्य करेन असे आश्वासन दिले त्यानंतर त्यांनी इमारत दुरुस्ती बद्दल विचारपूस केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed