आताच शेअर करा

दिनांक:०१/११/२०२६

सावंतवाडी:महाराष्ट्र परिवहन मंडळाने महिलांसाठी हाफ तिकिटांचा नियम काढला असून त्यासाठी महिलांना कार्ड देण्यात आले हे कार्ड महिलांच्या नावावर रजिस्ट्रेशन केले जाते आणि ऑनलाईन पद्धतीने मशीनचा वापर करून महिलांना हाफ तिकीटाची सुविधा देण्यात येते पण सिंधुदुर्गातील काही ठिकाणी अजूनही नेटवर्क ची सुविधा नसल्याने खेडोपाडी राहणाऱ्या महिलांना या कार्ड चा फायदा होत नाही त्यामुळे महिलाना फुल तिकीट काढावी लागत आहे. याचा भूदंड  खेड्यातील सर्वसाधारण महिलाना भोगावा लागत आहे.  कंडक्टर कर्मचारी नेट ची कारणे सांगून महिलांची फुल तिकीट घेऊन फसवणूक होत आहे. असे आरोप उबाटा सावंतवाडी तालुका संघटक भारती कासार यांना केला आहे. सावंतवाडी डेपोमध्ये  स्वतः जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणा करणार आहे.  त्यांनी स्वतः ह्या तिकिट कार्ड फसवणुकीचा अनुभव घेतल्याचे सांगितले त्या म्हणाल्या हाफ तिकीटच्या नावाखाली महिलांची फसवणूक कशासाठी? महिलांना सवलत दिली आहे की केवळ जाहिरातबाजी केली आहे?
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना हाफ तिकीटची सुविधा जाहीर करून मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात या सुविधेचा लाभ घेताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कार्ड काढून, रिचार्ज करूनसुद्धा नेट चालत नाही, मशीनमध्ये कार्ड स्वीकारले जात नाही आणि शेवटी महिलांना नाइलाजाने पूर्ण तिकीट काढावे लागते. मग प्रश्न असा आहे की, जर महिलांना प्रत्यक्षात हाफ तिकीटचा लाभच मिळणार नसेल, तर ही योजना कशासाठी?
आज माझ्याच बाबतीत हा प्रकार घडला. पण हा केवळ माझा प्रश्न नाही. अशा अनेक महिलांच्या तक्रारी समोर येत आहेत.
महिलांना सवलतीच्या नावाखाली मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड का?
आज मी स्वतः बस डेपोत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे आणि या संपूर्ण प्रकाराचा जाब विचारणार आहे.
महिलांना दिलेली सवलत ही केवळ निवडणुकीपुरती घोषणा नसावी. ती प्रत्यक्ष प्रवासात सहज आणि विनाअडथळा मिळालीच पाहिजे.
घोषणा नकोत, महिलांना त्यांच्या हक्काची सवलत मिळालीच पाहिजे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *