आताच शेअर करा

दिनांक:०१/११/२०२६

बांदा:सिंधुदुर्ग फळबागातदार शेतकरी संघासह जिल्ह्यातील इतर अनेक शेतकरी संघटनांनी वारंवार केलेल्या आग्रही मागणीमुळे व आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाला सरते शेवटी नारळ सुपारी व केळी या फळ पिकांचा समावेश  फळपीक विमा मध्ये करावा लागला .मात्र ऐनवेळी दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी वेबिनार मध्ये कृषी संचालक सर्व जिल्ह्यांचे माननीय जिल्हाधिकारी व माननीय कृषी अधीक्षक यांच्या समवेत सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर रायगड या जिल्ह्यातील शेतकरी संघटनांचा संवाद झाल्यानंतर फळपीक विम्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर जाहीर करण्यात आली होती .परंतु सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाने तत्परतेने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी व मा  कृषी अधीक्षक सिंधुदुर्ग यांना दिनांक २३ ऑक्टोंबर रोजी निवेदन देऊन या गोष्टींकडे लक्ष वेधले की अनेक शेतकऱ्यांचे फळपीक बाबतही केवायसी पूर्ण झालेली नसून याबाबत पूर्ण चूक ही शासनाची व रेंज नेट उपलब्ध नसल्याने झालेली आहे त्यामुळे अनेक शेतकरी या फळपीक विम्यापासून वंचित राहतील .शेतकऱ्यांनी प्रचंड संघर्ष करून प्रथमच नारळ सुपारी व केळी यांना फळ पिक विमा मध्ये अंतर्भूत केले परंतु त्यांचा लाभ  ३१ ऑक्टोंबर पर्यंत पाच टक्के शेतकऱ्यांनाही शक्य होणार नाही हे लक्षात आणून दिले .त्यानंतर महसूल व कृषी विभाग यांनी वरिष्ठ पातळीवर आग्रही मागणी केल्यानंतर रात्री उशिरा जीआर निघून १५ नोव्हेंबर पर्यंत फळे पिक विमा उतरण्याची अंतिम मुदत दिलेली आहे .सर्व नारळ सुपारी केळी बागायतदारांना विनंती आहे की त्यांनी आपली कागदपत्रे युद्धपातळीवर पूर्ण करावी व या योजनेचा लाभ घ्यावा .सातबारा मध्ये फळपीकक इपिक नोंदणी न होईपर्यंत निदान बागेमध्ये जाऊन जिओ ट्रेकिंग करून घेणे अतिशय जरुरीचे आहे .प्रत्येकाने आपल्या मोबाईल मध्ये नोट कॅम ॲप डाऊनलोड करून या कामाला सुरुवात करावी अशी विनंती सिंधुदुर्ग फळ बागायतदार शेतकरी संघाचे अध्यक्ष श्री विलास सावंत यांनी केली आहे .
महाराष्ट्र शासन तसेच माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व माननीय कृषी अधीक्षक सिंधुदुर्ग मॅडम यांचे विशेष आभार यावेळी सिंधुदुर्ग फळ बागायतदार शेतकरी संघातर्फे व्यक्त करण्यात येत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *