आताच शेअर करा

दिनांक: ०६/०९/२०२६

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्राण जीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून संस्था अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी मोफत वह्या वाटप करून संस्थेने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
असे प्रतिपादन कणकवली पंचायत समिती सदस्य श्री.लक्ष्मण उर्फ प्रदीप गावडे यांनी केले.
 
ते शिवडाव माध्यमिक विद्यालय येथे वह्या वाटप कार्यक्रमात बोलत

यावेळी शिक्षक दिनानिमित्त दिपप्रज्वलन करुन माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर
प्राण जीवन सहयोग संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष श्री.संदीप चौकेकर,शिवडाव हायस्कूल चे मुख्याध्यापक मुकेश पवार, सरपंच नितीश भिसे,शिरवल उपसरपंच प्रवीण तांबे, शिवडाव हायस्कूलचे शिक्षक विक्रम मुंबरकर,शिवडाव तंटामुक्ती अध्यक्ष काशीराम गावकर, सुनिल हरमलकर, गणेश शिवडावकर,प्राण जीवन सहयोग संस्थेचे तालुका अध्यक्ष प्रशांत गावडे, सदस्य मनोज राणे,अनिप सावंत, तुळशीदास कुडतरकर, गणंजय तेली,आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना गावडे म्हणाले की, गेल्यावर्षी प्राण जीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 5 हजार शालेय विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले.यावर्षी सात हजारांहून अधिक वह्यांचे मोफत वाटप करुन त्यांनी त्यांच्या पालकांवरील आर्थिक भारही हलका करुन विद्यार्थ्यांचे शिक्षण सुकर केले आहे.

यावेळी सरपंच नितीश भिसे म्हणाले की,
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुकर व्हावे यासाठी संदीप चौकेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत वह्या वाटपाचा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.त्यांचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श सर्वांना प्रेरणादायी आहे.

मुख्याध्यापक श्री.मुकेश पवार म्हणाले की,आज शिक्षक दिनानिमित्त वह्या वाटप कार्यक्रम म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे.प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या  संवेदनशील आणि दूरदृष्टी उपक्रमामुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग सोपा झाला आहे.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या पालकांच्या डोळ्यांतील कृतज्ञतेची भावना हीच या संस्थेच्या कार्याची पावती आहे. शिक्षणाप्रती असणारी ही निष्ठा आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक केल्याबद्दल प्राण जीवन सहयोग संस्था व अध्यक्ष संदीप चौकेकर यांचे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आणि शैक्षणिक क्षेत्रातून भरभरून कौतुक व अभिनंदन होत आहे.

यावेळी प्राण जीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून शिवडाव हायस्कूल च्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वहात होता.प्राण जीवन सहयोग संस्थेचे आणि अध्यक्ष संदीप चौकेकर यांचे मुख्याध्यापक मुकेश पवार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed