आताच शेअर करा

दिनांक: ०२/०९/२०२६

बांदा: निगुडे ता. ३१/०८/२०२६ निगुडे ग्रामपंचायत तहकूब ग्राम सभा सोमवार रोजी दुपारी ३:00 वाजत आयोजित करण्यात आली होती.सभा ३:१५ वाजता सभाध्यक्ष सरपंच लक्ष्मण निगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होऊन या सभेत तंटामुक्ती समिती अध्यक्ष म्हणून श्री.वासुदेव लक्ष्मण गावडे, माजी सैनिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून सरपंच निगुडकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तद्नंतर श्री.गावडे यांनी सभागृहाने आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला तंटामुक्ती समिती बिनविरोध अध्यक्ष केल्याबद्दल सभागृहाचे आभार व्यक्त करून आपल्यावर ठेवलेला विश्वास आपण सार्थकी लावून सर्वांना योग्य न्याय दिला जाईल व गावात होणारे तंट्टे सामोपचाराने निःसंकोचपणे मिटविले जातील अशी ग्वाही दिली.सभेचे कामकाज सचिव अक्षता गोसावी ग्रामसेविका यांनी पाहिले.या सभेस तलाठी सौ.गवाणकर मॅडम, डॉ.सौ.वराडकर मॅडम, पोलीस पाटील सौ.सुचिता मयेकर मॅडम, आरोग्य सेविका सौ.पंडीत मॅडम, अंगणवाडी सेविका सौ.प्राची राणे, श्रीमती,नुतन निगुडकर, सहाय्यक सौ. शिरसाट बाई, आशा सेविका सौ.भाग्यलक्ष्मीमोरजकर, कोतवाल तुषार सावंत,लवू जाधव,परेश गावडे, स्नेहल नाईक, सौ.संजना गावडे इ.उपस्थित होते.आजची सभा व तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवड खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed