अवघ्या काही दिवसात हरवलेला मोबाईल तक्रार कर्त्याला मिळवून दिला.
सिंधुदूर्ग:संपादकीय
दिनांक :१४ जुलै २०२४
बांदा येथिल टू व्हीलर चे गॅरेज चालवत असलेल्या सिद्धेश रेडकर यांचा मोबाईल बांदा पोलिसांनी
अवघ्या काही दिवसांत तक्रार नोंदवील्यावर आपल्या पोलिस यंत्रणेचा वापर करून आरोपी पर्यंत पोहचून मोबाईल हस्तगत करून सिद्धेश याला परत केला.
काल संध्याकाळी पोलिसांनी बांदा पोलिस निरीक्षक विकास बडवे आणि पोलिस हवालदार वेदिका गावडे यांच्या हस्ते मोबाईल सिद्धेश याला परत कऱण्यात आला. पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी जनतेला आव्हान केले की अशा घटना कोणत्याही व्यक्ती सोबत घडल्यास पोलिस स्टेशनला येऊन आपली सविस्तर माहिती व कागद पत्रे जमा करून तक्रार नोंदवील्यास सी ई आय आर पोलिस यंत्रणेच्या पोर्टल मार्फत कारवाई करून आपला मोबाईल सापडू शकतो. तसेच हवालदार वेदिका गावडे म्हणाल्या की आत्ता पर्यंत १७ तक्रारी बांदा पोलिस स्टेशन ला नोंद आहेत. त्यातील ८ तक्रार धराकांचे मोबाईल सी ई आय आर पोर्टल च्या अंतर्गत कारवाई करून मिळवून देण्यात आले आहेत.