आताच शेअर करा

दिनांक: १९/०७/२०२६

सातार्डा: सातार्डा मेसवाडी येते दुर्मिळ जातीचे खवले मांजर संजय वेंगुर्लेकर यांच्या घरा शेजारी फिरताना दिसले.खवले मांजर असल्याची  माहिती त्वरित सातार्डा पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ते यांना देण्यात आली.घटनास्थळी पारिपत्ते यांनी धाव घेतली. खात्री होताच लगेच वनक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांना कळविण्यात आले पाटील यांनी तातडीने दखल घेत जलद कृती दल यांना घटनास्थळी पाठवले. कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर यांच्या  टीम मधील सहकारी शुभम कळसुलकर, पुंडलिक राऊळ, शुभम फाटक यांच्या  कडे सुपूर्त करण्यात आले.या वेळी घटनास्थळी पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ते, वासुदेव राऊळ, संजय वेगुर्लेकर, विनोद राऊळ, योगेश गोवेकर, बाळा गोवेकर, प्रथमेश सातार्डेकर, संदेश गोवेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *