आताच शेअर करा

दिनांक: ०८/०६/२०२६

बांदा: प्रामाणिकपणाचा आदर्श ठरेल अशी घटना रोणापाल-बांदा मार्गावर घडली.
रोणापाल येथील रहिवासी महादेव सावंत यांचे दिनांक 07 जून 2026 रोजी रोणापाल ते बांदा या प्रवासादरम्यान पैशांचे पाकीट व बँक कार्ड हरवले होते.
त्याच मार्गाने कामानिमित्त जात असताना इन्सुली गावचे रहिवासी व सध्या निगुडे-कास परिसरात वायरमन म्हणून कार्यरत असलेले श्री. गुरुनाथ मंगेश कुडव यांना रस्त्यावर सदर पाकीट आढळून आले. पाकिटातील कागदपत्रांद्वारे मूळ मालकाची माहिती मिळवून कुडव यांनी कोणत्याही मोहाला बळी न पडता सर्व मुद्देमाल महादेव सावंत यांच्याकडे सुपूर्द केला.
कुडव यांच्या या प्रामाणिक व प्रशंसनीय कृतीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक मूल्ये जपणाऱ्या अशा कृती समाजासमोर आदर्श ठरतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed