आताच शेअर करा

दिनांक: २९/०४/२०२६

सावंतवाडी: कवठणी येथील एक जमीन मालक (एकूण एरिया 10 एकर ) या जागेमध्ये  मायनिंगचा डम्प साठा करण्याची शक्यता आहे.शासनाची रॉयल्टी चुकून  माल पलायन करण्याची तयारी चालू आहे. सावंतवाडी, दोडामार्ग परिसरात अशा ठेवलेल्या मायनिंग स्टंप वर काही दलाल प्रतिष्ठित राजकीय वरदहस्त लाभलेले लोक या कामी जोरदार हालचाली करत आहेत.अशी शक्यता  आहे.जमिनीचे मूळ मालक नाईक यांच्याकडून या  मालकाने जमीन खरेदी केलेली आहे. ती जमीन (कायम एन .ए ) आहे. अशा जमीनीत  डम्प खनिज करण्याची तयारी  चालू आहे.ठेवलेल्या अवैद्य खनिजावर  काही दलालांचा डोळा आहे. त्या डंप चा मायनिंग ग्रेड ही उच्च प्रतीची असल्या ने शासनाच्या डोळ्यात धुळ झोकुन शासनाची रॉयल्टी चुकवण्याचा प्रयत्न चालू आहे. ही रॉयल्टी चुकून भरमसाठ पैसा कमवण्याच्या तयारीत काही दलाल आहेत. त्यामुळे ते सैरावैरा फिरत आहेत. असे अवैध खनिज गोळा करून    एका जागेवर डंप करून ठेवतात. या ठेवलेल्या खनिजावर दलालची नजर  पडल्यास  त्या वर डोळा ठेवून त्याची मायनिंग ग्रेड तपासून ही उच्च प्रतीचा असल्याची खात्री करतात. अशा डम्पवर शासनाची रॉयल्टी नसल्याने हा डंप खरेदी करण्यास सोपा जातो. त्यामुळे त्यांचा खर्चही वाढत नाही. साधारण अशा मायानिगचा  रेट एक टना मागे दोन हजार रुपये असतो. अशा अवैद्य मिळालेल्या फुकट खनिजाचा पुरेपूर फायदा घेऊन करोडो रुपयाची उलाढाल करण्याची दलालांची तयारी आहे.. सध्या कवठणी येथे अशा प्रकारच्या हालचालीं सुरू आहेत. अशा हालचाली कोकण व्हिजन न्यूज च्या नजरेत आलेले आहेत. या न्यूज चॅनलच्या
टीम ने पाहणी केल्यावर  निदर्शनास आले आहे. या सर्व कामामध्ये  जागेपर्यंत जात  असणाऱ्या शेतकऱ्याना हाताशी धरून जमिनीतून रस्ता जात असल्यास त्या मालकांना  हाताशी घेऊन त्यांना तुटपूजा किमतीवर भागवलं जातं. कुठल्याही परिस्थितीत हा माल जाग्यावर ट्रकने भरून आजूबाजूच्या मायनिंग वाल्यांना विकला जातो. अशा पद्धतीचं कटकारस्थान राजरोस पणे शासनाचे रॉयल्टी चुकवून मालामाल होण्याची तयारी या दलालांनी दाखवलेली आहे. पण कोकण व्हिजन न्यूज  या दलालांची योजना  हाणून पडण्याची तयारी केलेली आहे. तसे फोटो ग्राफ ही हाती लागलेले आहेत.अशा मालकाचे नाव गट नंबरही हाती लागलेले आहे.शासनाची  काही माणसे यात असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.कोकण व्हिजन अशा दलालांच्या मागावर आहे.भविष्यात सर्व पुरावे घेऊन स्पॉट रिपोर्ट करण्याच्या तयारीत ही चॅनेल ची आहे.ही  खनिजाची उलाढाल करून सर्व माल तिथल्याच मायनिंग वाल्यांना विकला जाणार  आहे असेही निदर्शनास आलेले आहे.आणि  हा सर्व माल ट्रकच्या सहाय्याने रेडी बंदर पर्यंत पोहोचवला जाणार आहे. या गोष्टीकडे शासन डोळे झाक करण्याची शक्यता दिसत आहे. म्हणून शासनाने वेळीच यावर आळा घालावा व शासनाची असलेली रॉयल्टी वसूल करावी असे वरील न्यूज चॅनलने  म्हणणे आहे. न. पेक्षा पुराव्यसाहित पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed