आताच शेअर करा

दिनांक: २८/०४ /२०२६

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा वार्षिक ‘पुरस्कार वितरण सोहळा’ गुरुवार ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.  सावंतवाडी येथील शिल्पग्राम सभागृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
     या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत – भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, सभापती सुस्मिता जाधव, उप सभापती गौरव मुळीक, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
     या कार्यक्रमात पत्रकारितेच्या क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल विविध मान्यवरांना सन्मानित केले जाणार आहे. यात पत्रकार श्री. रुपेश हिराप यांना वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार,
श्री. भगवान शेलटे यांना कै. हरिश्चंद्र वाडीकर आदर्श समाजसेवक पुरस्कार,,
सौ. मंगल नाईक-जोशी यांना माजी आमदार तथा ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार, जेष्ठ पत्रकार श्री. अभय पंडीत यांना कै. पांडुरंग स्वार स्मृती जीवनगौरव पुरस्कार तर श्री. संतोष परब यांना स्व. त्रि. अ. उर्फ बाप्पा धारणकर अष्टपैलू स्मृती पुरस्कार व कणकवली येथील छायाचित्रकार श्री. हेमंत काळसेकर यांना ज्येष्ठ पत्रकार तथा छायाचित्रकार कै. मुरलीधर तथा बंडोपंत भिसे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या मुख्य पुरस्कारांसोबतच विशेष प्राविण्यप्राप्त पत्रकार आणि पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव देखील यावेळी केला जाणार आहे.
      तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, सचिव विजय राऊत, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सहसचिव विनायक गांवस आणि कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *